मिलिन्दपंत,

सुंदर गझल... सगळेच शेर छान आहेत. पाडगावकरांनीही हाच काफ़िया, हीच रदीफ़ वापरून लिहिलंय की!

गालातल्या खळीला खुलवून रात्र गेली
लटका तुझा अबोला ठरवून रात्र गेली....
सुंदर...

झाली विलीन ज्योती ओजात भास्कराच्या
नाते समर्पणाचे उमजून रात्र गेली
.... वा!

या वृत्तात अनेक कविता किंवा गझला आहेत. आचंद्रसूर्य नांदो, लाजून हासणे, काटा रुते कुणाला, डोळ्यात सांजवेळी, त्या कोवळ्या फुलांचा, कै. भटांची नाही म्हणावयाला आता असे करुया, इत्यादी.

यांपैकी अनेक दादरा (काटा रुते कुणाला, लाजून हासणे-६ मात्रा) तालात आहेत, काही केरव्यात (डोळ्यात सांजवेळी, त्या कोवळ्या फुलांचा-४ मात्रा) आहेत आणि काही रूपक तालातही (नाही म्हणावयाला-७ मात्रा). एकाच तालातली आणि एकाच वृत्तातली गाणी असल्यास एका चालीत दुसरं म्हणणं शक्य होतं. कधी कधी चालही अनुरूप असली तर ते चांगलंही वाटतं.

- कुमार