जग कुठे चालले आहे आणि ही लोक अजूनही आपल्या जातीला कवटाळून बसली आहेत. त्याचबरोबर मला दुसऱ्या जातीला नांव ठेवणाऱ्या लोकांचाही तितकाच राग येतो. मला वाटते आपण आता भावीपिढी पुढे आपण 'मानवता' ही एकच जात असल्याचे उदा. घालून दिले पाहिजे.
मोरेश्वरा जात जाते का रे अशी? इतक्या वर्षांत नाही गेली तर ती आता जाईल आणि कुणा कुणाला विरोध करणार?
आरक्षणाच्या चर्चेत 'असहमतीने' बोलणाऱ्यांवर की 'सहमतीने' बोलणाऱ्यांवर?
मी ब्राह्मण कुलात जन्मून मांस-मटण खातो असे म्हणणाऱ्यांवर?
की मी ब्राह्मण कुलात जन्मून मुलांना मांस-मटण खायला लावते असं सांगणाऱ्यांवर?
की मी ब्राह्मण असून नवरा इतर जातीचा आहे हे सांगणाऱ्यांवर?
की ब्राह्मण असा शब्द लिहीणे हेच पाप आहे?
गेल्या काही दिवसांत मला हा छुपा जातियवाद इथे फारच दिसून आला. तो स्पष्ट सांगते, (प्रशासकांनी हा प्रतिसाद सरळ उडवून लावावा)
शिवश्री आपल्या शिवधर्माची जाहिरात करतात (ते सर्वानुमते जातियवादी) त्यांना विरोध करायला कोर्डे आपल्या जातीची निखालस खोटी वाहवा करतात आणि ब्राह्मणेतर मागासवर्गियांना आत्मपरीक्षण करावे अशी मुजोरीची जातियवादी भाषा करतात. त्यांना खरे खोटे दाखवून दिले तर शिऊरकर 'ब्राह्मणांना मारले हो अशी दवंडी पिटतात' व वर तुम्हाला सहमती देणारे कुशाग्र मलाच शिवश्रींच्या पंक्तीत बसवतात.
अंधानुकरण हा इथला अविभाज्य भाग आहे. 'आम्ही अमुक जातीचे' असे सांगून आपलं श्रेष्ठत्व सांगू नये हे मी स्वतःबद्दल बोलते आहे हे समजून न घेता मला तुम्ही इतरांना शिव्या देता का असा प्रश्न विचारणे कशाचे द्योतक आहे?
तोच मला छुपा जातियवाद वाटतो आणि जर वाटतो तर त्याबद्दल बोलायचे नाही कि काय?
मनोगतासारख्या सुसंस्कृत आणि साहित्य संपन्न ठिकाणी तरी निदान असले काही वादग्रस्त विषय आणि प्रतिसाद मला अपेक्षित नव्हते. मला वाटत होते की मनोगत हे नि:पक्षपणे मत व्यक्त करण्याचे साधन आहे.
कमाल आहे, नि:पक्ष आहे म्हणून तर प्रतिसाद शाबूत आहेत. मध्यंतरी मनोगत संघिष्ठ आहे का म्हणून एक चर्चा रंगली होती. ती हाणून पाडली गेली. मलाही मनोगत संघिष्ठ वाटत नाही. परंतु जात सर्वच काढून दाखवतात, त्याबरोबर वादही यायचाच. मी जात-पात मानत नाही हे सांगतानाही जात काढून दाखवावीशी वाटते.
मला माझे विचार मांडण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्यात जर मला इतर मंडळी जातीयवादी वाटत असतिल तर ते सांगण्याचंही आहे. तसंच मला इतर जातींविषयी काही बोलण्यापूर्वी स्वतःच्या जाती विषयी बरे-वाईट बोलण्याची मुभाही हवीच. (हे करत असताना डोळे झाकून या बाई आमच्या जातीबद्दल काहीही बोलतात असं ओरडणाऱ्यांची आता मला सवय झाली आहे.)
जातीयवादाचा निषेध मी ही करते. पण तो इतरांच्या जातीला नावे ठेवण्याचा आणि आपली जात श्रेष्ठ आहे हे भासवणाऱ्यांचा.
आता मूळ धरू लागलेला हा जातीयवाद पुढे फोफावण्याची शक्यता जास्त आहे.
असहमत.
मला या लोकांची कीव करावीशी वाटते.
करत बसा. अमोल म्हणतात त्याप्रमाणे इतरांनी काय करावे आणि त्यांच्यावर कोणाते निर्बंध लावावेत हे सांगणे ही एक प्रकारचा जातियवादच आहे.