ठळकपणे जाणवणारा फरक म्हणजे इथल्या पालकांची आपल्या मुलांवर सन्स्कार करायची पद्धत. फाजील लाड अजिबात नाहीत व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते स्वातंत्र्य.

एकदा खरेदीला गेलो असताना एक ९-१० वर्षांचा मुलगा शाळेतल्या दप्तरासाठी (backpack) हट्टून बसला होता. त्याची आई त्याला ते दप्तर महाग आहे आपण ठरवलेल्या किंमतीपेक्षा $१० ने अधिक आहे असं सांगत होती. थोड्यावेळाने तो मुलगा जास्त हट्ट करू लागला तेव्हा आईने सांगितले, "ठरवलेली (budget) रक्कम मी देते त्यावरची रक्कम तू तुझ्या पॉकेटमनीतून दे. प्रत्येक गोष्टीला किंमत असते, तू सांगितलंस आणि हट्ट केलास म्हणून ती मला परवडेलच असं नाही. तेंव्हा आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू स्वकमाईतून येतात हे पहा."

मुलाने निमूट होकार भरला आणि दप्तर उचलंल.