वा वा ! छान लेख.. मजा आली.
मला मांजरांचे व्यवहार लांबून पहायला आवडतात. फार देखणी असतात.
पण मांजरे फारच जवळ येतात. मग मात्र संताप येतो. त्यात काळी जीन्स असेल आणि पांढरे मांजर मांडीवर येऊन बसले की सत्यानाश. त्याचे ढीगभर केस सगळ्या कपड्यांवर. माझ्या मित्राकडे असेच एक मांजर होते. मी त्याच्याकडे गेलो की आधी त्या मांजराला एक रट्टा द्यायचो. मग ते मी असे पर्यंत त्या खोलीत फिरकायचे नाही. हा उपाय बरा जमला होता.
पुढील लेखांच्या प्रतिक्षेत,
--लिखाळ.