लेख आवडला. एरवी मी मांजरांना घाबरत नाही. पण काही वर्षापूर्वी ऑफिसच्या रेकॉर्ड रूममध्ये काही रेकॉर्ड आणायला घाईघाईने गेले. कसली तरी चाहूल लागली म्हणून बघितले तर एका रॅकवर तीन चार नुकतीच जन्मलेली मांजराची पिल्ले होती आणि त्यांच्या बाजूला नजर रोखून उडी मारण्याच्या पवित्र्यात त्यांची आई उभी होती. तिची ती भेदक नजर बघून भीतीची लहर अंगातून सळसळत गेली. मांजरीकडे बघून असे वाटले की कुठल्याही क्षणी ही अंगावर झेप घेऊन कडकडून चावा घेईल. मी लगेच मागच्या मागे काढता पाय घेतला. खुर्चीत येऊन बसल्यावरही माझे पाय कितीतरी वेळ लटपटत होते.