ह्या प्रश्नाचे उत्तर सर्वांना नक्कीच ठाऊक आहे.
रामायणासंबंधात अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो.सीतेचा त्याग करताना रामाने केवळ राजा म्हणून लोकरन्जनाला महत्त्व दिले.पती म्हणून आपले कर्तव्य अजिबात पाळले नाही.आणि अशा व्यक्तीला त्याने केवळ दुसरा विवाह केला नाही यासाठी भारतीय समाजाने मर्यादापुरुषोत्तम,एकपत्नीव्रत पाळणारा म्हणून देवत्व बहाल करून टाकले.यावरून स्त्रीला किती प्राधान्य होते आणि आजही आहे याचा अंदाज करणे अवघड नसावे!