मी नुकताच मनोगताचा सदस्य झालो आहे.
अहो, मग जरा वाट बघा ना. नीट अवलोकन करा आणि मग लिहा. आल्या आल्या काय एकदम सुधारणा करायला निघालात. :)

मनोगतासारख्या सुसंस्कृत आणि साहित्य संपन्न ठिकाणी तरी निदान असले काही वादग्रस्त विषय आणि प्रतिसाद मला अपेक्षित नव्हते.
अशा ठिकाणी काय फक्त आल्हाददायक विषयच विचाराधीन असतात?

मला वाटत होते की मनोगत हे नि:पक्षपणे मत व्यक्त करण्याचे साधन आहे. 
हो, काही वेळा पक्षपात होत असेल पण नेहमी नाही असे मला वाटते. शेवटी सर्वांचे आपले स्वत:चे मत असते.