पंड्यांच्या आणि बडव्यांच्या ताब्यात जाणारे कसले हो हे देव? आणि जिथे पंडे आणि बडवे नाहीत, तिथे संस्थाने आहेत, विश्वस्त मंडळे आहेत....
काशी-विश्वेश्वराच्या अंधाऱ्या कुबट गल्ल्यांतून घाणीने बरबटलेल्या त्या मंदिरात डोकावून बघावे (मी पाहिले आहे) , आषाढी- कार्तिकीला होणारी पंढरपुराची अवस्था आठवावी, गणेशोत्सवाच्या दिवसात गावातली घरे सोडून दुसरीकडे जाण्याची वेळ आलेले प्रातिनिधिक पुणेकर बघावेत....
देव अशा ठिकाणी असतो का, हे स्वतःला प्रामाणिक राहून विचारावे.
मग तो नसलेला देव पंड्यांच्या ताब्यात राहिला काय, आणि बडव्यांच्या काय, काय फरक पडतो?