मला वाटत. आपण 'संस्कार' ह्या विषयावर आपली मते मांडूयात. 'माझे संस्कार किंवा माझ्यावर झालेले संस्कार' हा आपला विषय नाही.
रामरक्षा काय किंवा इतर श्लोक काय, या वयात शिकवल्यामुळे त्याचे
फायदेच होतात तोटा तर निश्चितच होणार नाही. त्याच बरोबर बडबडगीते,
आपण आपल्या आई वडिलांकडून, आजी-आजोबांकडून शिकलेली गाणी, गोष्टी
या सगळ्यागोष्टी आपण मुलांना शिकवू शकतो, आणि हळूहळू याच छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होते. आपली संस्कृती,
आपल्या घरातून लहानपणा पासून लावल्यागेलेल्या सवयी, वेळोवेळी आई वडिलांकडून मिळालेली चांगल्या आणि वाईटाची जाण, हे न विसरणे म्हणजे
संस्कार. मग तुम्ही जगाचा पाठीवर कुठेही जा, या गोष्टी कधीच विसरल्या जात नाहीत. जसे , जेवायला बसायच्या आधी हातपाय धुऊन येणे (निदान हात तरी)
आता परदेशात हे सगळे एटीकेट्स चालतात की नाही याचा मला अनुभव नाही.
पण संस्कार म्हणजे काय हे माझ मत.
ऱाखी