प्रवासी,भाष

आपण केलेले रोवळीचे वर्णन बरोबर आहे.  ह्या रोवळीचा उपयोग तांदुळ ,पोहे आणी चिरलेल्या भाज्या धुण्यासाठी होतो. आणखी एक उपयोग म्हणजे चक्याचे श्रीखंड बनवताना पण होतो, म्हणजे श्रीखंडाचे यंत्र नसेल तर ते रोवळीमधे घोट्ता येते. मी पाहिलेली एक रोवळी होती ती धातुपासुन बनवलेली नव्हती, ती कशापासुन बनवलेली असते मला सांगता येणार नाही. गहू पाखडण्याचे सूप ज्या पासुन बनवलेले असते त्यापासुन ती बनवलेली होती. त्या material चे नाव माहिती आहे, पण आठ्वत नाही. कदाचित भाष त्याबद्दल सांगु शकतील.

रोहिणी