तेव्हा संस्कार करणे म्हणजे मुळात असलेली वस्तू/व्यक्ती अधिक चांगली होण्यासाठी केलेले प्रयत्न असे मला वाटते
जर संस्कार म्हणजे एखादी वस्तू अधिक चांगली बनविणे तर मग ते आपल्या काय किंवा त्यांच्या काय , कुठल्याही पद्धतीने चांगलेच होणार.
इथे राहून आपले संस्कार कसे होणार याचा जरा प्रश्नच पडतो नाही
मूळ प्रश्न हा आहे की तुम्हाला "आपले" भारतीय संस्कार करायचेत की "त्यांचे"अमेरिकन की दोन्ही. कदाचित तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या बाईंच्या मनात 'मुलीला आपल्या संस्कृतीची ओळख कशी होणार? ' असं विचारणं अपेक्षित असेल. मुलीवर संस्कार का केले नाहीत हा प्रश्न अपेक्षित नसावा.
एक पालक म्हणून आपल्या मुलांना सदोदित चंगले नागरिक बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. हे करित असताना त्या त्या ठिकाणच्या चालीरिती , चांगल्या सवयी(मॅनर्स) आपण शिकवतोच.
आजकाल संस्कार हा शब्द काहीवेळा केवळ क्रियाकर्मे, रितीभाती सांभाळणे या अर्थाने वापरला जातो ते मात्र चुकीचे आहे. माझ्यामते भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी पाठांतर, रामरक्षा शिकवण्यात हरकत काहीच नाही. पण हे करणं का आवश्याक आहे याचं स्पष्टीकरण देता यायला हवं. ''रामो राजमणि" म्हणताना आपण काय आणि का म्हणतोय हे मुलांना शिकवलं तर ते पाठांतराची सवय, भारतीय संस्कृतीची ओळख या दृष्टीने उपयुक्त ठरेल. तसेच हे करत असताना रामाचे सद्गुण मुलांच्या मनावर ठसवता येतील आणि त्याद्वारे सुसंस्कार सुद्धा होतील.
पंचतंत्रातील गोष्टी काय आणि इसापच्या गोष्टी काय मुलांना बऱ्यावाईटाचे ज्ञान दोन्हींतून मिळू शकते त्यामुळे पंचतंत्र आपले आणि इसाप त्यांचा असा भेदभाव बाळगण्याची गरज नाही.
साती काळे.