सध्याच्या जागतिकीकरणाच्या वातावरणात मुलांना तुमचं आमचं अस शिकवण्यात काहीही अर्थ उरलेला नाही. सगळ्याच मुलांना चांगलं वागण्याचे, नैतिकतेचे, शिष्टाचाराचे, वाणीचे संस्कार देणं आवश्यक झालेलं आहे. आपल्याला कुठे माहिती आहे की आपली मुलं मोठी होउन नक्की अमेरीकेतच किंवा नक्की भारतातच रहाणार आहेत. त्यामुळे सध्या संस्कार ही गोष्ट 'ग्लोबल' करणं आवश्यक आहे. चांगलं वागणं हे सदासर्वदा आणि सर्व संकृतींमध्ये चांगलंच रहाणार आणि तेच खरे संस्कार आहेत. संध्याकाळी घराबाहेर मित्रांना शिवीगाळ करायचा आणि घरी येऊन शुभंकरोती, रामरक्षा आणि श्लोक म्हणायचे हेही संस्कार नव्हेतच.