>>अज्जुकाबाईंचं प्रियालीवर एकदाच शरसंधान करून समाधान झालं नाही बहुदा. प्रशासकांनी प्रतिसाद काढून टाकल्यावरही बाण मारणं चालूच आहे. <<
अरेव्वा या प्रियालीने आपले बरेच वकील जमवलेत की इथे. एका साध्या सरळ विचारलेल्या प्रश्नाचा विपर्यास करून त्यात मला अपेक्षित नसलेला अर्थ काढून त्यावरून वैयक्तिक पातळीवर जाऊन मला बोललं गेलं आणि त्यावर मी उत्तर दिलं तर शरसंधान? ही तर खरीच गोष्ट आहे की माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही प्रियालीने दिले नाहीये उलट तिला असा कोड्यात टाकणारा प्रश्न विचारल्यावर ती चिडून तिने आरडाओरड सुरू केली. इतर ठिकाणी जाऊनही माझं नाव न घेता माझ्याबद्दल बडबडत राह्यली. आता नंतर दुसऱ्या कुणाला तिच्या काही विधानांमधे आक्षेपार्ह वाटले किंवा चुकीचे वाटले आणि दुसरा कुणी त्यावर काही म्हणू गेला तर मी त्याला सावध केलं यालाही बाण मारणं म्हणता तुम्ही? तुमच्या म्हणण्यात तथ्य असतं तर प्रशासकांनी फक्त माझाच प्रतिसाद काढायला हवा होता हो. पण तुमच्या गरीब बिचाऱ्या प्रियालीचाही काढून टाकला एवढेच नाही तर तिच्या मूळ लिखाणातले नवऱ्याच्या जातीबद्दलचे उल्लेखही काढून टाकले.
>>म्हणजे पाठांतराचा बुद्धीशी काही संबंध नाही का? नसेल तर पाठांतर न केलेलं चांगलंच की हो. <<
पाठांतर आणि ऍनॅलिटिकल माइंड यामधे फरक कराल की नाही? पाठांतर करण्याची सवय असणे हे गरजेचे असते ते कधीही उपयोगाला येते. १०-१२वी फक्त पाठांतरावरच आधारीत असतात. ते कितीही अयोग्य असले तरी ते तुम्हीआम्ही नाही ना बदलू शकत. मग सवय हवीच पाठांतराची. आणि त्याही पुढे जाऊन बुद्धीला पाठांतराची जोड असणं गरजेचं असतं आयुष्यात. अर्थात तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्नाला काही अर्थ नाही तुम्ही मी म्हणेन ते खोडून काढायचे या मिशन वर आहात असे दिसतेय.
>>प्रशासक, मला वाटतं जीवनजिज्ञासा आणि अज्जुका यांच्या वरिल प्रतिसादावरसुद्धा आक्षेप घेण्यात यावा.<<
थोडक्यात काय प्रियालीच्या विधानांवर प्रश्न विचारण्याचा किंवा त्यातली योग्यायोग्यता तपासण्याचा कोणाला अधिकार नाही. ते तुम्हाला मान्य नाही आणि म्हणून ते काढूनच टाकलं पाहिजे. नाही का? कारण तुमची प्रियाली आणि तुम्ही म्हणता ते योग्यच त्याच्या पेक्षा वेगळे मत असले की आक्षेपार्ह!! बरं चाललंय.