त्याच वेळेला जेजे किंवा इतर कला महाविद्यालयांमधे कमर्शिअल आर्ट साठी मुली आणि मुलांची संख्या मात्र बरीचशी सारखीच असते.. (हे निरीक्षण चूक असल्यास योग्य ती परिस्थिती कृपया सांगावी.). या एवढ्या मुली जातात कुठे?
बऱ्याच मुली फाईन आर्ट्स चा अभ्यासक्रम करून 'वेबपेज डिझाईन' किंवा छोटी-मोठी प्रॉड्क्ट डिझाईन करणाऱ्या कंपन्यांमधे जातात त्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना मुली इथेही असतातच. पण त्या ठळकपणे स्वतंत्र व्यवसाय करत नसल्याने कदाचित दिसत नसाव्यात. पण तरीही आर्टवर्क-पब्लिसिटी मधे मुली का नसाव्यात हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.