कालच्या चतुरामध्ये सौ स्नेहलता देशमुखांनी फार समर्पक अशी व्याख्या दिली. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार. संस्कार म्हणजे सजगता, संवेदनशीलता, सहयोग, सुसंस्कृतता, सहमत, सहभाग, सहिष्णूंत, सदविचार, सदाचार आणि सदसद्विवेकबुद्धीने वागणे. रामरक्षा म्हणण्याने जर वाणीची शुद्धता, पाठांतर असे सुसंस्कार होणार असतील तर रामरक्षा किंवा तत्सम इतर धर्मातील श्लोक म्हणायला काय हरकत आहे. पाठांतराची शालेय अभ्यासक्रमात नक्कीच मदत होते. आज मुलांना पाढे तोंडपाठ नसतात त्यामुळे गणितं लवकर सोडवता येत नाहीत हे नक्कीच आजचे पालक मान्य करतील. संस्काराचा संबंध धर्माशी न जोडता आचरणाशी जोडायला पाहिजे म्हणजे अनुप्रिता म्हणते त्याप्रमाणे ती ग्लोबल होईल.