मोरूभाऊ,
मनोगतावर अनेक उत्तमोत्तम लेख, चर्चा, कविता प्रकाशीत होते असतात. आपण नवे आहात तर आपल्याला ते सर्व कालांतराने वाचायला मिळेलच.
आपले जे प्रथमदर्शनी मत झाले त्याला माझ्या मते फार किंमत आहे. पाहुणे म्हणून येणाऱ्यांना आणि नव्या सभासदांना मनोगत कसे वाटते ते यातून समजते. येथे सर्वजणच कधी ना कधीतरी नवे होते. पण प्रत्येक सभासद येण्याच्या वेळी येथे जशी परिस्थिती असेल तसे त्याचे सुरुवातीचे मत बनेल. (म्हणजे काही वेळा सामाजिक प्रश्नांवर ओळीने अनेक चर्चा होतात तर कधी अजून काही.) तर आपण कोणताही ग्रह करून घेऊ नका ही विनंती.
आता माझा अनुभव सांगतो. मी आलो त्या वेळी मी सुद्धा नेमके जातीवाचक असे अनेक प्रतिसाद आणि चर्चा पाहिल्या. त्यामुळे मी तर विचारातच पडलो आणि माझा असा समज झाला होता की (तो काही फार वेळ टिकला नाही) येथे तुमचे आडनाव (त्यावरून जात !), गाव (पुणे हा हा हा) यावर फारच उहापोह होतो आणि चर्चा करणारा मनोगती काय म्हणतोय यापेक्षा 'तो पुण्याचा आहे ना ! मग बरोबर', असे उल्लेख होतात असेच मला दिसले. पण तो माझा गैरसमज होता.
आपण येथे दिलखुलास लिहा.
शुभेच्छा,
--लिखाळ.