सातीताई,

प्रतिसादात जर आपले असे मत असेल तर वाचा असे  प्रतिसादातील वाक्य आपणच दिले आहे, मग अट्टाहास वा व्यक्तिगत टिकेचा प्रश्न येतो असे वाटत नाही. आता माझ्या प्रतिसादातील पुढील वाक्ये त्यांना उद्देशून नाहीच. यापेक्षा अधिक स्पष्टपणा कोणता असू शकतो?

 या पुढील सर्व वाक्य चर्चेकरता आहेत कोणत्याही एका व्यक्तीला उद्देशून नाहीत.

संस्कार ह्या चर्चेत कोणतेही ज्ञान उच्च अथवा कमी दर्जाचे नसते, केवळ आपल्याला माहिती नाही म्हणून त्याचा उपयोगच नाही असे म्हणणे चूक आहे.  हे  मत ह्या चर्चेत प्रदर्शित करणे मुद्द्याला धरून वाटले. संस्कार जसे व्यक्तिसापेक्ष आहेत आणि काळानुसार त्यांची व्याख्या बदलणे आवश्यक आहे असे वाटते.

इथे काही प्रतिसाद असे दिसतात की मनात आलेले विचारणे एवढाही मोकळेपणा येथे कधी कधी दिसत नाही असे म्हणावेसे वाटते.  केवळ गैरसमज करून सदस्य पुढे जात असतील तर "वाद, विवाद आणि संवाद याला अर्थ नाहीये."

एखाद्या वाक्याचा अर्थ प्रत्येकजण कुवतीनुसार घेणार. त्यामुळे गैरसमज होतात, होतीलही. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे, अधिक स्पष्ट लेखन करणे व इतरांना सुद्धा तसे प्रयत्न करायला सांगणे हा आज माहितीजालावर वावरण्याच्या व्यक्तिसापेक्ष संस्कारांचा भाग होऊ शकतो.

प्रशासकांना आक्षेपार्ह वाटणारे प्रतिसाद ते स्वतःच उडवत असतात, ते यापुढेही तसे करतील यात शंका नाही.