काही गोष्टी, जसे की पाढे, पाठ करायला काहिच हरकत नाही. पण केवळ परिक्षेत गुण मिळवण्यासाठी आख्खे पुस्तक आणि नवनीत गाईड अगदी प्रश्नोत्तरांसकट सगळेच पाठ करण्यात काय अर्थ आहे? प्रश्नांची उत्तरे (दुसऱ्या कोणीतरी लिहलेली) पाठ करुन लिहणे ही एक प्रकारची कॉपीच नव्हे का. माझ्यामते ह्या प्रकारच्या घोकंपट्टिला विरोध हवाच.
एखादा विषय किंवा कविता जर छान समजली तर गोष्टी आपोआप पाठ होतात, घोकंपट्टीची गरजच पडत नाही. त्या विषयावर उत्तरेही स्वतःच्या भाषेत देता येतात. सगळीच पुस्तके फक्त संदर्भासाठी असतात. ती वाचुन आपले मत बनवता यायला हवे. पाठांतराची अगदीच गरज नाही असे नाही पण विषय समजावुन घेण्यावर भर हवा. (आता परिक्षेच्या दोन दिवस आधीच पुस्तक उघडायचे असेल किंवा अत्यंत नावडता विषय असेल तर घोकंपट्टिला पर्याय नाही!)