प्रिय जीजी,

'रामायण आणि तत्सम श्लोक' हे इंग्रजीतल्या  'रामायण आणि सोकॉल्ड श्लोकाज़' ह्या शब्दसमूहाचे भाषांतर असावे असा अंदाज बांधून जो प्रतिसाद दिला तो तत्सम (तुमच्या सोकॉल्ड ह्या अर्थाने) अनावश्यक, आगाऊ आणि खोडसाळही वाटू शकतो. मला तसे वाटत नाही. मला त्यात एका संस्कृतिरक्षकाची निखालस कळकळ दिसते, हे स्पष्टपणे सांगतो. :):)

झाल्या प्रकाराला 'मीटिंग द ट्रबल हाफ़ वे' असे म्हणता येईल. आता ह्याचे भाषांतर करताना तुम्हाला अंदाज बांधावा लागणार नाही.

पण असो. 'डोन्ट बर्न द ब्रिजेस' एवढेच म्हणीन.

तुमचा,
चित्तरंजन