मग तो नसलेला देव पंड्यांच्या ताब्यात राहिला काय, आणि बडव्यांच्या काय, काय फरक पडतो?
कमाल आहे...
नास्तिक असाल तर देव नाहीच किंवा पंड्यांच्या ताब्यात जाणारा देव कुचकामाची ही भूमिका मान्य! पण मग देवच नाही तरी त्याच्या नावाने पोळी भाजून घेणारे हे दलाल बाजूला होण्याने चांगलेच होईल...
आस्तिक असाल तर देवाच्या भेटीला गेल्यानंतर त्यांनाही हे मध्ये लुडबुड करणारे नको असतात... प्रसन्न चित्ताने "त्याचीच" भेट हवी असते. भाविकांच्या मते कदाचित अशा बाजारूंना कंटाळून देव निघून गेलेला असावा...
हिंदू धर्मस्थळांची अस्वच्छता आणि तेथील एकूणच व्यवस्था ह्यात सुधारणा करू तितकी थोडीच आहे. मधले दलाल हालविणे हे नक्कीच सकारात्मक पाऊल आहे. त्याने फरक नक्कीच पडेल.
नकारात्मक आणि काळजीच्या बातम्यांनी जग भरलेले आहेच... असे योग्य दिशेने पडलेले पाऊल पाहिले की समाधान वाटते.
खुलासा - आस्तिक/ नास्तिक या संज्ञा ढोबळपणे वापरलेल्या आहेत... त्याच्या नानाविध छटांमध्ये येथे शिरणे संयुक्तिक वाटत नाही.