monologue म्हणजे स्वगत कसे?

स्वगत म्हणजे स्वतःशीच, स्वतःलाच उद्देशून केलेले भाषण, तर monologue म्हणजे दुसऱ्याला उद्देशून केलेले पण ज्यात प्रतिपक्षाच्या प्रतिसादाचा अंतर्भाव नाही असे भाषण.

त्यामुळे monologue म्हणजे 'एकतर्फी भाषण' म्हणता येईल फारतर.

'स्वगत' म्हणजे मला वाटते soliloquy असावी.

अर्थात soliloquy हा एक प्रकारचा monologueच असतो, पण कोणताही monologue हा soliloquy नसतो.

- टग्या.

१०%हून अधिक रोमन अक्षरांबद्दल क्षमस्व. आता हे स्वगत पहा:

अरे रामा, या १० टक्क्यांच्या फेऱ्यातून कसं सुटायचं रे, देवा! रामा, तूच सोडव रे यातून! तुलाच डोळे आहेत रे, बाबा! लहानपणी रामरक्षा शिकलो नाही रे, आता तुझा कोणत्या शब्दांत धावा करू? धाव रे रामराया! भक्ताच्या हाकेला ओ देऊन धाव रे, धाव! भक्ताची लाज चाललीय, धाव रे, धाव! अरे हो, पण द्रौपदीच्या हाकेला कृष्णानं ओ दिली होती, रामानं नव्हे! माझीच चूक!