प्रियालीताई, 
पत्रातून आपण एक अतिशय महत्त्वाचा विचार इथे मांडला आहे. त्याबद्दल आपले आभार. लेख प्रभावी आहे.

जोडीदाराविना आपल्या अपत्याला वाढवणाऱ्या स्त्री पुरुषांनी उतारवयात आधारासाठी विवाहाचा निर्णय घेतला तर त्यांना समस्येला सामोरे जावे लागते. आपल्या समाजव्यवस्थेमुळे व काही धारणांमुळे स्त्रियांना याला अधिक प्रमाणात तोंड द्यावे लागते असे सुद्धा म्हणू. पण अशा परिस्थितीला पुरुषांना सुद्धा सामोरे जावे लागते कारण ज्या भावना व अपेक्षा मुलांच्या एकट्या असणाऱ्या आईविषयी असतात त्याच वडिलांविषयीसुद्धा असतात असे सांगावेसे वाटते.

ह्याशिवाय काही शंका वा मुद्दे आहेत .

  1. हे आईने मुलीला लिहिलेले पत्र आहे त्यामुळे याला स्वगत म्हणता येणार नाही असे वाटते.
  2. पत्रात बोलीभाषा असली तरी व्याकरणाचे काही नियम जरूर पाळावे.
  3. मुलगा किंवा मुलगी दोघांनाही चिरंजीवच म्हणतात.

    चू.भू.द्या̱. घ्या.
शुद्धलेखन चिकित्सकास 'स्वगत' हा शब्द नवीन वाटला.