पाठांतराच्या महत्त्वाविषयी दुमत नाही, हेच प्रतिसादावरून जाणवते. पण विषय समजून तार्किक विचार करून केलेले पाठांतर अधिक फायद्याचे असते यात शंका नाही.
जशी समज वाढेल तसा समजून पाठांतर करण्यावर भर असावा. पाठांतर म्हणजे एखाद्या गोष्टीचा अधिकाधिक सराव असा व्यापक विचार केला तर हा सराव आवश्यक आहे असेच वाटते. त्यामुळे असा सराव केवळ श्लोक, पाढे, नियम, व्याख्या, गृहीतके याएवढाच सीमित राहू नये.
न समजता केलेले पाठांतर कधी कधी बिकट परिस्थिती निर्माण करते, तेव्हा विषय समजला असेल तरच उत्तरे देता येतात हा अनुभव सर्वांनाच आहे.
पाठांतराचा त्याग करावा असे मुळीच वाटत नाही