अडचण : मजकूर दोन्ही समासांशी जुळवताना (जस्टिफाय) दोन शब्दांतली जागा प्रसंगी वाढवायला लागते आणि ही जागा नेमकी कोठे सोडावयाची त्यासाठी देवनागरी जोडाक्षरे, शून्य रुंदीच्या मात्रा उकार इत्यादी वर्ण ह्यांचे भान ठेवावे लागते. आय ई मध्ये हे भान ठेवले जाते. इतर न्याहाळकांमध्ये हे भान अजून आलेले दिसलेले नाही. तेव्हा त्या न्याहाळकांमध्ये वरील प्रमाणे जास्तीची जागा सोडताना ती अयोग्य जागी सोडली गेल्याने अक्षरे तुटकी दिसतात.
इलाज/नाइलाज : सर्व न्याहाळकांमध्ये मजकूर व्यवस्थित दिसावा असे वाटत असेल तर मजकूर दोन्ही समासांशी जुळवू नये. मनोगताच्या लेखन सुविधेत दोन्ही समासांशी मजकूर जुळवण्याची सुविधा ठेवलेली नाही, ती ह्यासाठीच.