सूप हे बांबूच्या तट्ट्याचे विणून केलेले असायचे. ते विणणे हे मोठे कौशल्याचे काम आहे. बांबू ओले असताना त्याचा लवचिकपणा लक्षात घेऊन ते सूप बनते. नंतर ते वाळले की कडक होते. त्याला रंग लवून त्यातल्या भेगा बुजवल्या जातात.
[बांबूच्या पट्ट्यांनी विणून वस्तू तयार करणार्या कारागिरांना/धंदेवाल्यांना बुरूड म्हणतात हे आता शिकवतात का मुलांना? (( मुलं म्हणजे मुलगे आणि मुली दोन्ही आहेत आणखी वाद नकोत))]
अर्थात अगदी पूर्वी तैल रंग नव्हते तेव्हा ( आणि माझी आजी वापरायची तेव्हाची) सुपे ही गाई/म्हशीच्या शेणाने सारवलेली असायची. जमीन (शेणाने) सारवणे, जेवण झाल्यावर खरकटे काढून जणाचा गोळा फ़िर्वऊन साफ करणे ही फार वेगळी स्वच्छता होती. पूर्वी खेड्यात असलेल्या प्रथा आता बहुधा कालामानाने नाहीशा झाल्या असाव्यात.
बरं थोडं सुपाबाबत: माझी सूपाने पाखडण्यात अगदी तरबेज होती. सूपात पाखडून भाजलेल्या (शेंग)दाण्याची साले काढणे म्हणजे अगदी सोपे. ती तादळातला कोंडा काढणे, नंतर त्यातल्या कण्या वेगळे करणे अगदी सहज करीत असे. कधी लहन कण वेगळे करून अखंड धान्य मागे ठेवायचे तर कधी (कण्यांसारखे) लहान कण मागे ठेऊन मोठे पदार्थ वेगळे करायचे हे ती लीलया करीत असे. एक कलाच होती तिच्याकडे.
(लाडका नातू) सुभाष