प्रियालीताईंनी छान गोष्ट लिहिली आहे.  विचार स्वातंत्र्याला अनुसरून ती त्यांची गोष्ट आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. लेखकाने असेच पात्र/पात्रे का रंगविले असा मुद्दा आणणे योग्य नाही. (अ.म.प्रा.वा. IMHO)

चर्चेमध्ये मतांना विरोध किंवा वेगवेगळे पर्याय असू शकतात, पण लेख, कविता यांत तसे म्हणणे योग्य नाही.  तो एक कलाप्रकार आहे.  त्याला प्र्तिसाद त्यानुसारच असावे.

अवांतर- मोनोलॉग  आणि सॉलिलोक्वे ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे.  मोनोलॉग हा ग्रीक भाषेतून तर सॉलिलोक्वे हा लॅटीन भाषेतून आलेला शब्द आहे.

कलोअ,
सुभाष