पत्राच्या सुरूवातीला येणारे चिरंजीव हे विशेषण म्हणून वापरले आहे आणि म्हणून चिरंजीवी होणार नाही. खालचे स्पष्टीकरण पहा पटते का.
अवांतर
चिरंजीव हा मूळ शब्द 'विशेषण' आहे. मोल्सवर्थ् चा शब्दकोष आपण दिलात. आमच्या जवळच्या शब्दकोशाची प्रत जाळ्यावर आहे की नाही ते माहिती नाही. चिरंजीव ह्या शब्दाचा अर्थ असणारे अमर, अविनाशी, प्राचीन ,पुरातन शब्द सुद्धा विशेषण म्हणून वापरले जातात. अशा वेळी विशेषणाचे लिंग न बदलता , त्यापुढे येणाऱ्या नामाचे रूप बदलणे आवश्यक आहे,
जसे चिं चिन्मयला किंवा चिं चिन्मयीस... (चिन्मयीस हा बदल प्रियालीताईंनी केला आहे.)