आईची उतारवयातील समस्या (भावनिक आधाराची) तरुण वयातील मुलीला समजणे जरा अशक्यच आहे. आई स्वतः तरुण असताना तिच्या आईच्या बाबतीत असा प्रसंग उद्भवला असता तरी कदाचित तिची प्रतिक्रिया अशीच असती. ह्याला कारण म्हातारपणातील मानसिक अवस्थेचे योग्य भान तरुण वयात येत नाही. मुलीने आज घेतलेल्या भूमिकेचे कदाचित ती स्वतः जेव्हा आईच्या आजच्या वयाला पोहोचेल तेंव्हा (तसाच प्रसंग समोर आला नाही तरीही..) तिची चूक तिला उमगेल. (पण तेंव्हा उशीर झाला असेल.) 
    पेठकरांच्या या मताशी मी सहमत आहे. विषय जरी जुना असला तरी  ज्या रितीने मांडला आहे त्यामुळे कथा प्रभावी झाली आहे.