मंडळी,
मला माफ करा. मी मागचे दोन दिवस व्यस्त असल्याने तुम्हा सर्वांना वैयक्तिक प्रतिसाद देऊ शकलो नाही.
ही चर्चा सुरू करण्या आधी मला असे जरूर वाटत होते की मी 'लहान तोंडी मोठा घास' तर घेत नाही ना ? पण नंतर असा विचार केला की आपले मत प्रामाणिक आहे तर मग कशाला घाबरायचे ? ही चर्चा सुरू करण्या मागे माझे काही उद्देश होते -
१. मला मनोगतावरची ही 'जातीयवादता' अधोरेखीत करायची होती. ज्याने करून पुढच्या वेळेस नवीन मुद्दे, विषय काढताना, प्रतिसाद लिहिताना लोक अधिक प्रगल्भपणे विचार करतील किंवा जातीवाचक उल्लेख कसा टाळता येईल असा एकदा तरी विचार करतील. असे एकाने जरी केले तरी मी ही चर्चा सफल झाली असे समजेन.
२. ज्यांना अजूनही ही 'जातीयवाद'ता इथे दिसली नाही त्यांना मी म्हणेन की 'झोपेचे सोंग' घेतलेल्याला मी कसा बरे उठवू शकेन ? मला क्षमा करा. मला इथे सर्व दुवे एकत्र आणण्याएवढा वेळ नाही हो. काही प्रतिसाद तर प्रशासकांनीच उडवून लावले आहेत. ते (प्रतिसाद) आता अस्तित्वातच नाहीत.
३. काहींना भीती वाटली की मी आता धर्मवाद, प्रांतवाद काढत बसेन. तर मंडळी घाबरू नका. मी असे काहीही विषय काढणार नाही. मुळात ज्या पद्धतीने हिंदू धर्मात जाती पडल्या त्याविषयी मला आक्षेप आहे.जन्माने माणूस शूद्र जातीचा बनतो याला मला आक्षेप आहे. स्वतःला उच्च जातीचे समजणारे सगळेच काही नेहमीच पवित्र कार्य करीत बसलेले नसतात आणि तोच कर्मठपणा किंवा पुरोगामीपणा इथे अभिमानाने मिरविणाऱ्यांविरुद्ध माझा आक्षेप आहे. स्वतःला जातीने शूद्र समजणाऱ्यांचीही मला दया येते. स्वतः आत्मपरीक्षण केल्यावर जातीतील फोलपणा तुम्हाला ही जाणवेल.
४. 'लिखाळ' म्हणतात तसे माझे हे प्रथमदर्शनी मतही असेल किंवा हे जातीयवाद उल्लेख इतर चांगल्या साहित्याच्या मानाने नगण्यदेखील असतील. ही गोष्ट चंद्राच्या डागासारखी तर नाही का ? मग आपण असेच (जसे मला बऱ्याचजणांनी 'गुपचुप जे जे होते ते पाहत राहावे' असा सल्ला दिला) मजा बघत बसायचे का ? कसलाच विरोध नोंदवायचा नाही का ? एक कुजका आंबा हजारो चांगले (देवगडी असले तरी) आंबे नासवू शकतो (काय बरोबर ना तात्या ! ;)
असो ज्यांना समजायचे असेल त्यांना समजले असे गृहीत धरतो. नाही त्यांनी मी हा आक्षेपार्ह विषय काढल्याबद्दल क्षमा करावी. धन्यवाद !
- (खोडकर) मोरू