मला जी उडत उडत माहीती आहे, त्या प्रमाणे बडव्यांचा पुर्वीइतका प्रभाव (अथवा "भाव") राहीलेला नाही. कधीकाळी महाराष्ट्र सरकारने त्यावर काहीतरी व्यवस्था लावली आहे. कोणीतरी मनोगती यावर प्रकाश टाकू शकेल.याचा अर्थ सर्व काही आलबेल असेल नाही.  

एकंदरीत गंमत एव्ह्ढीच आहे की हिंदूंच्या धर्मसंस्थांना आणि देवळांना सरकारी नियमात बसवले जाते (त्यात काही चूक नाही, पण) तसे कायदे इतर धर्मियांना लावले जात नाहीत. हे फक्त भारतातच घडू शकते!

मी लहान असताना पंढरपूरला गेलो होतो. तेंव्हा काही बडव्यांनी त्रास दिल्याचे आठवत नाही. पण त्या आधी काही काळ माझ्या आजोंबांना अडवायचा प्रयत्न केल्याचे माहीत आहे.

पंढरपूरला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही अस्पृश्यांना देवळात जायला बंदी होती. पुढे साने गुरूजींनी यावर चळवळ करून वाट मोकळी करायला लावली.  पी. सावळाराम यांनी लिहीलेले आणि आशा भोसल्यांनी म्हणलेले "पंढरीनाथा झडकरी आता.." हे गाणे याच विषयावर आहे.

आता राहीला प्रश्न "असले कसले देव" या विषयाचा. देव मानण्यावर आहे - अगदी हिंदू धर्माप्रमाणे ही (रूढीप्रमाणे काहीही असेल). स्वच्छता असली पाहीजे हे मान्य. पण त्याव्यतिरिक्त बरेचजण हे भक्तीपोटी आणि प्रेमापोटी विठ्ठलाला भेटायला जातात. जर आपण व्यक्तिस्वातंत्र्य मानत असलो तर जो पर्यंत कोणी आपल्या मागे लागत नाहीत अथवा कुठे बाँब टाकत नाहीत तो पर्यंत त्यांच्या भक्तिला नावे ठेवून आपण करतो तेच शहाणपणाचे लक्षण मानून इतरांना तुच्छ मानायची गरज नाही.