लैंगिक शिक्षण व्हावे हे ठीक. पण त्यासाठी शिष्टाचारांचा भंग गरजेचा आहे का?

थोडक्यात, गाडी कशी चालवावी याचे शिक्षण द्या. पण ती भरधाव गर्दीत सोडू नका.

पश्चिमेचे सगळेच चांगले असते किंवा सगळेच वाईट असते असे नाही. तसेच पूर्वेचेही सगळे टाकाऊ आहे किंवा सगळे उरी धरून बसण्यायोग्य आहे असेही नाही. थोडा सुवर्णमध्य साधायला हवा.