यावर जिजींशी सहमत
म्हणजे तुम्ही नक्की कशावर सहमत हो?
जीवन जिज्ञासा
आता तुमच्या मूळ प्रश्नाकडे वळू.
इतरांचा आदर म्हणजे काय? याचे उत्तर मी माझ्यापरीने देते.
१. इतरांच्या मताचा आदर करणे. अर्थात जर ती योग्य वाटत असतील तर. जर ती अयोग्य वाटत असतील तर त्यांचे खंडन योग्य शब्दात व्यक्तिगत टीका न करता करणे. एकदा व्यक्तिगत टीका करायची झाली की समोरचाही तीच करू शकतो हे गाळलेल्या प्रतिसादांत दिसले. जे लिहीलेलेच नाही, अभिप्रेतही नाही त्यावरून तुम्ही असे करता का, असे शिकवता का असे 'खोडसाळ आणि अश्लाघ्य भाषेत' विचारणे हे त्या व्यक्तिला अपमानास्पद ठरू शकते आणि ती व्यक्ति त्याच शब्दांत प्रत्युत्तर करू शकते. शब्दाने शब्द वाढला तरी कुठेतरी गप्प बसावे, इतरांचा आदर करून, ज्याने कुठेतरी हे थांबेल. त्यानुसार माझ्या या प्रतिसादा नंतर मी गप्प बसण्याचे ठरवले आहे.
२. दुसरे बोलत असताना ते काय बोलत आहेत हे समजून घ्यावे. त्यांना काय अभिप्रेत आहे याचा 'थोडे थांबून' विचार करावा. आपल्या मनातले विचार इतरांवर थोपवणे सोपे असते. (जर आपल्याला तत्सम शब्दाबद्दल शंका होती तर निरसन करण्याचे इतर मार्ग होते, इतर वेळेस आपण मला सहज व्य. नि. पाठवता तसा पाठवून विचारता आले असते परंतु आपल्या प्रतिसाद वाचून प्रत्येकाचे लक्ष अवांतर वर गेले यावरून ओळखावे.)
३. इतरांना आवडी निवडी असू शकतात याची दखल घ्यावी. आपण ज्या सूचना देतो त्या इतरांना applicable असतीलच की नाही हे पहावे. इतरांच्या भावनांबद्दल जागरूकता दाखवावी. (एखाद्याला लाल रंग आवडत नाही, याचा अर्थ त्याला हिरवा रंग आवडतो म्हणून समोरची व्यक्ती पाकिस्तानप्रेमी आहे आणि देशद्रोही आहे असे आपल्या मनातले अर्थ काढून लावणे हे एखाद्याचा अनादर करू शकते.)
४. लोकांच्या पाठी मागून केवळ ऐकिव ज्ञानावर त्यांची बदनामी किंवा gossiping करू नये. (माझ्या मूळ प्रतिसादात माझ्याच आणि माझ्या कुटुंबाच्या जातीवर मी टीप्पणी केली होती, त्यात आक्षेपार्ह असे मला वाटले नाही पण त्याचा अर्थ न काढता उपप्रतिसाद आले.)
५. आपला गैरसमज होऊन आपण इतरांना दुखावेल असे बोलले असू तर त्यांची क्षमा मागावी यात इतरांचा आदर होतो असे मला वाटते. (जे बऱ्याच जणांना जमत नाही. मला सहज जमते. ज्यांना जमत नाही ते आपण कसे बरोबर होतो हे दाखवत फिरतात.)
मला वाटतं इतरांना शिकवणं सोपं असतं, माणूस त्याप्रमाणे वागतोच असे नाही. तरीही लहान मुलांना अशाच बाबी शिकवाव्या. पुढे जाऊन ते आपले निर्णय स्वतः घेतातच.
आपण एके ठिकाणी लिहीलत की
एखाद्या वाक्याचा अर्थ प्रत्येकजण कुवतीनुसार घेणार. त्यामुळे गैरसमज होतात, होतीलही. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे, अधिक स्पष्ट लेखन करणे व इतरांना सुद्धा तसे प्रयत्न करायला सांगणे हा आज माहितीजालावर वावरण्याच्या व्यक्तिसापेक्ष संस्कारांचा भाग होऊ शकतो.
आपले भाषाविषयक ज्ञान पाहता आपल्याला सो कॉल्डचा अर्थ माहीत नसणे अशक्य वाटत नाही. पण जर तो माहीत नव्हता तर मूळ प्रश्न एका वाक्यात टाकून पुढे ५-६ ओळींचे अवांतर का टाकावे? त्यामुळे आपल्याला काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट झाले असे वाटते का?
तत्सम या शब्दावरून असा गैरसमज इतर कुणाचाही झालेला नाही तेंव्हा याला खोडसाळपणा का म्हणू नये याचे उत्तर जाणून घ्यायला आवडेल.
आपण चुकीचा अर्थ काढला जर अर्थाबद्दल संदिग्धता होती तर थोडं थांबून अवांतर लिहीता आले असते. ते सोडून आपण कमीपणा/ तुच्छतेच्या नसलेल्या गोष्टी केल्यात. एखाद्याच्या डोक्यात न आलेले विचार अशा तऱ्हेने घालणे हा सुसंस्कृतपणा आहे काय?