चिरंजीव चे स्त्रीलिंगी रूप चिरंजीवी असेल असे वाटत नाही. दक्षिणेत चिरंजीवी नावाचा पुरूष नट आहे. चिरंजीव/वी ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ चिरकाल जिवंत असणारा/री/रे असा होतो. जीव आणि जीवी मध्ये नक्की कसा भेद करावा/करतात हे जाणून घ्यायला आवडेल.

'परजीवी' (पॅरासाईट्स) असा सजीवांचा एक प्रकार आहे. परजीवी म्हणजे दुसऱ्या जिवावर जगणारा. त्यामध्येही परजीव म्हणजे नर आणि परजीवी म्हणजे मादी असा भेद नाही.

वरवर पाहता एखादा विशिष्ट तो जीव आणि त्यापद्धतीने जगणारे असे सामान्यीकरण केल्यास ते जीवी असा भेद जाणवला.

थोडक्यात, मुलीसाठी चिरंजीवी वापरण्याबद्दल मी जीवन जिज्ञासा यांच्याशी सहमत आहे.