संगीताच्या प्रसारामध्ये भातखंडे, पलुस्कर वगैरे मराठी लोकांचे महत्त्व मोठे आहे. त्यांना मराठी चिजा शास्त्रीय संगीतामध्ये वापरून रूढ, लोकप्रिय करणे अवघड नव्हते. चिजा बांधणे हे जादूची कांडी फिरवण्यासारखे सोपे नाही हे मान्य, पण त्यासाठी भाषा आड येत नाही. मात्र संगीत जाणकारांवर व्रज, हिंदी भाषेचा प्रभाव, संस्कार असल्यामुळे ते इतर भाषांना प्राधान्य देत नाहीत, असे मला वाटते. पलुस्कर, भातखंदे प्रभृतींनी मराठी चिजा मैफिलींमध्ये गायल्या असत्या तर त्या आतापर्यंत नक्कीच लोकप्रिय झाल्या असत्या, असे मला वाटते.