माझ्याकडून अनवधाने चुकीचा शब्द वापरला गेला असे दिसते. त्याचे खंडन इथे झाले आहे ते योग्य वाटते. माझा गैरसमज अशा रीतीने दूर झाला ते चांगलेच म्हणायचे. त्याबद्दल आभारी आहे.
अवांतर:
चिरंजीव हा मूळ शब्द 'विशेषण' आहे. मोल्सवर्थ् चा शब्दकोष आपण दिलात. आमच्या जवळच्या शब्दकोशाची प्रत जाळ्यावर आहे की नाही ते माहिती नाही. चिरंजीव ह्या शब्दाचा अर्थ असणारे अमर, अविनाशी, प्राचीन ,पुरातन शब्द सुद्धा विशेषण म्हणून वापरले जातात. अशा वेळी विशेषणाचे लिंग न बदलता , त्यापुढे येणाऱ्या नामाचे रूप बदलणे आवश्यक आहे,
तत्सम या शब्दाचा अर्थ बघण्यासाठी आपल्या जवळच्या शब्दकोशाचा वापर का केला गेला नाही, ते ही तो प्रतिसाद आपला स्वतःचा असताना (आणि इतरांची चूक नसताना) हे कळेल का?