नामदेवमहाराज,
एकंदरीत गंमत एव्ह्ढीच आहे की हिंदूंच्या धर्मसंस्थांना आणि देवळांना सरकारी नियमात बसवले जाते (त्यात काही चूक नाही, पण) तसे कायदे इतर धर्मियांना लावले जात नाहीत. हे फक्त भारतातच घडू शकते!
हे म्हणणे वास्तवाला धरून नाही. सर्वच धर्मस्थाने सरकारी नियमाखाली असतात. मशिदी, चर्चेस यांच्या व्यवस्थापनेला तेच नियम लागू असतात. किंबहुना नव्या मशिदी किंवा चर्चची स्थापना करेणे हे नवे देऊळ निर्माण करण्यापेक्षा जास्त अवघड असते.
याबाबतील कायद्यांची माहिती असणारे यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.
कलोअ,
सुभाष