ज्या सदस्यांनी चर्चेत प्रतिसाद दिले त्या सर्वांचे आभार. कोणाच्या चुका दाखवणे हा हेतू कधीच नव्हता, नाही. त्यायोगे योग्य शब्द समजणे महत्त्वाचे.

प्रियाली, आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे. आपली चूक मान्य करण्यास मनाचा मोठेपणा असावाच लागतो.

अवांतर: तत्सम शब्दाचा अर्थ आम्हाला माहिती आहे, त्याची पडताळणी करण्यास शब्दकोशाची गरज नाही. परंतू एखादा शब्द वाक्यात कशा अर्थाने वापरला जातो वा त्यातून जो एकत्रित अर्थ निघतो तो सुद्धा महत्त्वाचा आहे. एखाद्याच्या प्रतिसादात आपण घेतो तो एक अर्थ व इतरांना जाणवतो तो वेगळा असे होत असेल तर त्या प्रतिसादात तसे मत होण्यास कारण आहे असे वाटते.

इतरांना तसा अर्थ जाणवला नाही की त्यांनी तसे नमूद केले नाही ? या दोन वेगळ्या गोष्टी होऊ शकतात . आपल्याला ही शक्यता जाणवली का?

वाक्य जर नकारार्थी असेल तर त्याचा एकंदर वाक्यावर परिणाम होतो असे वाटते. आपले तेच वाक्य आज पुन्हा वाचले, तरी तोच अर्थ जाणवला हेच खेदाने म्हणावेसे वाटते. पण आपण आपल्याला तसे म्हणायचे नाही असे सांगितले त्यामुळे आम्ही तो विषय वाढवणे हे  मुद्दाम आकसाचे वागणे आहे म्हणून तसे करणार नाही; पण आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची यथाशक्ती उत्तरे त्याच चर्चेत देऊ.

अनवधान असा शब्द आहे, चिकित्सकात भर घालावी अशी प्रशासकांना विनंती.