प्रियालीताई,
>>आपण उत्तरादाखल जो प्रतिसाद लिहिला आहे तो आवडला. त्याने सर्वांचे आत्मपरीक्षण होण्यास मदत होईल. आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या नेहमीच आचरणात आणल्या तर लेखन स्पष्ट होईल, संयमित होईल, विषयांतर टळेल. असेच आत्मपरीक्षण आम्हालाही आवश्यक आहे तर चर्चा योग्य दिशेने चालेल अथवा व्यक्तिगत हल्ले सुरूच राहतील.
आपले भाषाविषयक ज्ञान पाहता आपल्याला सो कॉल्डचा अर्थ माहीत नसणे अशक्य वाटत नाही. पण जर तो माहीत नव्हता तर मूळ प्रश्न एका वाक्यात टाकून पुढे ५-६ ओळींचे अवांतर का टाकावे? त्यामुळे आपल्याला काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट झाले असे वाटते का?
>>अर्थ माहिती आहे. हो तसेच वाटते, याहून अधिक स्पष्ट लेखन करता येणार नाही.
तत्सम या शब्दावरून असा गैरसमज इतर कुणाचाही झालेला नाही तेंव्हा याला खोडसाळपणा का म्हणू नये याचे उत्तर जाणून घ्यायला आवडेल.
>>गैरसमज झाला नाही की तो गैरसमज आपल्यापर्यंत आला नाही?
>>खोडसाळपणा जरूर म्हणा; पण तीच नजर तशीच आपण आपल्या पुढील प्रतिसादावर सुद्धा फिरवा,
भाषांतर आपणच केलेले दिसते आहे. तेंव्हा असल्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज वाटत नाही. वर म्ह्टलेच आहे बरे-वाईट व्यक्तिसापेक्ष असते. तशी नजर आणि समजही सापेक्षच असते. तेंव्हा आपल्या समजाने जर असा अर्थ निघत असेल तर तसाच घ्या. माझी समज अशी नाही.
>>>रागवणार नसाल असे गृहीत धरून सांगावेसे वाटते की ठळक वाक्यातून राग व्यक्त होतो, समोरच्याच्या विधानाचा आदर न करता त्या सदस्याला उलट उत्तर दिले असे होते. कालच हा प्रतिसाद वाचला होता आपण जसा खोडसाळपणा काढलात तसा उद्धटपणा आम्हालाही दर्शवता आला असता, पण तसे काही केले नाही.
समज व नजर जर व्यक्तिसापेक्ष आहेत तर आमच्या मतांवर राग का धरावा? जशी आपली विधाने सरळ आहेत तशीच आमची सुद्धा आहेत. ही दुसरी बाजू सुद्धा तेवढीच खरी आहे. ती सुद्धा आपण पहावी.
आपण चुकीचा अर्थ काढला जर अर्थाबद्दल संदिग्धता होती तर थोडं थांबून अवांतर लिहीता आले असते. ते सोडून आपण कमीपणा/ तुच्छतेच्या नसलेल्या गोष्टी केल्यात.
>>अर्थाबद्दल संदिग्धता नव्हती आणि नाही. अर्थ जो जाणवला त्यानुसार विधान केले. आपले मत तसे नसेल तर सोडून द्या असे स्पष्ट सांगितले. तरीसुद्धा आपण तोच मुद्दा घेऊन पुन्हा चर्चा करत आहात. याला आपण आपल्याच आदराच्या सचोटीवर घासून पाहा बरे.
एखाद्याच्या डोक्यात न आलेले विचार अशा तऱ्हेने घालणे हा सुसंस्कृतपणा आहे काय?
>>>नाही, चुकीचे विचार एखाद्याच्या डोक्यात घालणे सुसंस्कृतपणा नाही. कुणाच्याही डोक्यात विचार घातले नाहीत, इथे मत प्रदर्शित करणे म्हणजे कुणाच्या डोक्यात ते विचार घालणे असे नाही. निदान आमचे तरी नाही. विषयावर संयमित व संतुलित चर्चा होणे एवढेच अपेक्षित आहे.
अवांतर
आताच एक चर्चा वाचली, त्यावरील आपला प्रतिसादही वाचला. आणखी एक युक्तिवाद आहे पहा कसा वाटतो ते. .
" मनातले विचार एखाद्याने ओळखले आणि त्यावर विचारणा केली, तेव्हा तसे नव्हतेच असे म्हणणे कोणत्या सभ्यतेत बसते? त्यावर आकसाचे एकाहून अधिक प्रतिसाद सगळीकडे द्यायचे? एक प्रतिसाद जो वर नमूद केला आहे, ज्याला आम्ही उद्धट म्हणू शकतो तो प्रतिसाद वाचून तर असा समज नक्की होऊ शकतो. कालांतराने आपल्याला चूक उमगली तर ती मान्य करायची की अडून बसायचे? "
हे वाक्य हलकेच घ्यावे अशी विनंती. तरी देखील आपण वरील वाक्याने दुखावले जाल असे वाटते म्हणून आधीच क्षमा मागत आहे. (आपल्या आदराच्या व्याख्येची ताबडतोब अंमलबजावणी)
>>आपली मते किंवा कोणाचीही एका चर्चेतली मते कोणत्याही इतर चर्चेत मुद्दाम आमच्याकडून येणार नाहीत याची खात्री बाळगा. त्यांची उत्तरे त्या त्या चर्चेतच देऊ. ती चर्चा संपली ,युक्तिवाद संपला. प्रतिसाद मतांना द्यावे, आपल्या शिवाय इतरांनी येथे मुद्दे उपस्थित केले त्यांना उत्तरे दिली आहेत. प्रतिसाद मतांना द्यावे .ही संवादाची, चर्चेची आमची मुख्य बैठक राहील. आत्मपरीक्षणाचा एवढा फायदा नक्की होईल.