टगोजी,

तुमचे म्हणणे बरोबर आहे. 'स्वगत' हा शब्द सलिलक्वी (soliloquy) साठी चपखल आहे. 'सलिलक्वी' मध्ये नट, लेखक स्वतःच्या विचारांत गुरफटलेला असतो. स्वगत स्वतःला उद्देशून असते. अशा वेळी साधारणतः नट रंगमंचावर एकटा असतो. उदाहरणार्थ: हॅम्लेटचे स्वगत.

मॉनलॉग दुसऱ्याला उद्देशून असतो. मॉनलॉग (monlogue) चे अर्थ
१. चारचौघांशी बोलता-बोलता एखाद्याने केलेले (दुसऱ्याला उद्देशून) लांबलचक (आणि अनेकदा रटाळ) वक्तव्य, भाषण. उदाहरणार्थ: ही वेंट इंटू अ लाँग मॉनलॉग अबाउट लाइफ़ इन अमेरिका.
२. नाटकात, चित्रपटात एखाद्याने एकट्याने केलेले लांबलचक भाषण
३. एखाद्याने विशेषतः छंदात बांधून ऐकवलेली एखादी नाट्यमय कथा.


आता, मॉनलॉगला काय म्हणायचे?

चित्तरंजन
१. ऑक्सफ़र्ड ऍडवांस्ड लर्नर्ज़ डिक्शनरीतून साभार.