दुसऱ्या वर्षात इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनच्या प्रयोगांचा तास गिमोणकर नावाचे तरुण प्राध्यापक घ्यायचे. आमच्या बॅचमध्ये ९ मुली आणि ४ मुलं. प्रयोग चालू असताना बरेचदा आम्ही कँटिनला जाऊन यायचो. गिमोणकरांच्या अर्थात हे लक्षात आले होते. पण आम्ही त्यांना फारसे जुमानत नव्हतो.
एके दिवशी न राहवून त्यांनी मला विचारलं, "भट, तुम्ही ह्या ऍममीटर, वोल्टमीटरची शप्पथ घेऊन सांगा गेले पाऊण तास तुम्ही कुठे होता?"
मी काही उत्तर देण्याआधीच एक मुलगी म्हणाली, "कशाला सर. ऍममीटर, वोल्टमीटर बंद पडायचे. आम्हाला हा प्रयोग आजच संपवायचा आहे." आणि सारे खो-खो हसायला लागले.