प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

पाठांतराचे समर्थन करण्याचे मुख्य कारण म्हणजे (माझ्या मते) मुलांच्या अभ्यासक्रमांत असणाऱ्या गोष्टींचे पूर्ण आकलन होण्याइतका जगाचा अनुभव त्यांना नसतो. त्यामुळेच शिक्षकी पेशांत नसलेले पालक जेव्हा आपल्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करतात व मुलाला समजत नाही असे त्यांना आढळून येते तेव्हा "इतकी साधी गोष्ट याला कशी समजत नाही" असे मनांत येऊन त्यांना राग येतो. पण पुरेसा अनुभव येईपर्यंत अभ्यासक्रम लांबणीवर टाकणे शक्य नसते. म्हणून पाठांतर करून स्मृतींत साठवून ठेवणे इष्ट.

कृपया या मुद्द्यावरही मते मांडवीत.