सन्जोपराव,
लेख एकदम झकास आहे ! खूप आवडला.
मला संजीवकुमार एक अभिनेता म्हणून तूफान आवडले असे चित्रपट कोणते ते मी सांगितलं असतं पण मला अशी पटापट नावं नाही आठवत चित्रपटांची.. दोनच चित्रपट नावाने आठवत आहेत, ते म्हणजे - अंगूर आणि शोले.
एका चित्रपटात संजीव आणि लीना चंदावरकर आहे. त्यात काँट्रॅक्ट मॅरेजचा मुद्दा आहे. संजीव जसा भंडावतो तिला.. ते खूप आवडलं. सही आहे त्याचा अभिनय चित्रपटात आणि लिनाचाही.
संजीवच्या एकाच चित्रपटात नऊ भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पकड घेणारी नाही, पण संजीवचा अभिनय एकदम झकास आहे चित्रपटात.
साधा - सोज्वळ तरीही काहिसा मिष्किल असा संजीवकुमारच्या चेहऱ्यावरील भाव मला नेहमीच जबरदस्त भुरळ पाडतो.