मी तुमच्या वरील मतांशी सहमत आहे.
पण स्वतःच्या चर्चेविषयी फारच सावधगिरी दाखवताय असे नाही का वाटत ? ;)
जर तुम्ही इतर मनोगतींच्या असहमत (थोडक्यात बोचणाऱ्या) प्रतिसादांची इतकीच धास्ती घेतली आहे तर मग ज्या मंडळीविषयी तुम्हाला हे मत प्रदर्शन करायचे आहे त्यांनाच व्य. नि. का नाही पाठवत ? काय राव तुम्ही देता की जाहीर असहमत प्रतिसाद-प्रसाद दुसऱ्यांच्या चर्चेला मग.... 'स्वतःचे ठेवा झाकून अन् दुसऱ्याचे पाहा वाकून' सारखे झाले नाही का ? ;)
ह्या खुल्या व्यासपीठाचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. असो याबाबतीत 'तुम्हाला आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे' असे औषध मी लिहून देतो. ;)
- (खोडकर) मोरू