प्रिय मोरू,

कुणी कसे प्रतिसाद द्यावेत ह्यावर कुणीही बंधन घालू शकत नाही. घालणे योग्य नाही. कुणी जातीयवादी किंवा आपल्याला न आवडणारे विचार मांडले आहेत असे वाटल्यास आपण त्याचा प्रतिसादातून समाचार घेऊ शकतो. त्यामुळे केवळ 'निषेध' न करता मनोगतावर कुठे जातीयवादी लिखाण आढळल्यास तिथेच उत्तर देऊन अशा प्रवृत्तींचा प्रतिकार करणे योग्य.

मनोगतावर वेगवेगळ्या विचारसरणींना मानणारी, वेगवेगळ्या तबियतीची मंडळी येतात. कारण त्यांना सभ्यतेच्या चौकटीत राहून आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे चर्चा रोचक बनतात असे मला वाटते. असे असले तरी चावून चोथा झालेले वादग्रस्त मुद्दे टाळावेत असे माझे मत आहे.
 
कुणी सतत एकांगी जातीयवादी विचार, चर्चा मांडत राहिला तर काही दिवसांनी मनोगती बहुधा कंटाळतात, त्याच्या अशा लेखनाला प्रतिसादही कमी होतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. अर्थात, ह्या गोष्टीला अपवाद नाहीत असे नाही.

ह्या उप्पर, एखादे लिखाण मनोगताच्या स्वास्थ्याला अपायकारक वाटल्यास प्रशासकीय कारवाई होते असाही अनुभव आहे.


चित्तरंजन