कुणाचे नाव घेऊन खालच्या दर्जाच्या भाषेत वैयक्तिक टीका करणे, हमरीतुमरीवर येणे अतिशय गैर. कधीकधी ह्या प्रतिसाद-उपप्रतिसादांना वाचून नळावरचे भांडण सुरू आहे की काय असे वाटते. नुकतेच एका चर्चेत काही प्रतिसादांच्या हे प्रकर्षाने जाणवले. झिंज्या उपटणे तेवढे राहिले होते. असो. वेळीच प्रशासकीय कारवाई झाली हे उत्तम झाले.
तसेच अनेकदा जुना हिशेब चुकता करण्यासाठीही प्रतिसादांचा वापर होतो. असा वापर खेळीमेळीत, सभ्यतेच्या चौकटीत झाल्यास माझी तरी काही हरकत नाही. पण तसे होताना अनेकदा आढळत नाही.
माहितीजालावर वावरताना डोक्यात राख घालून वावरणे बरे नाही. वसकन अंगावर येणाऱ्याचा किंवा कुरापत काढणाऱ्याचा थंड डोक्याने प्रतिसाद देणे सरावानेच साध्य होते.
चित्तरंजन