नावापुढे 'जी' असे ऐकायला खरोखरच कसेतरी वाटते. आपल्या मराठीत ताई, बाई, वहिनी, दादा, काका, मामा, राव, पंत, बाळ अशी अनेक संबोधने असतानाही 'जी' चा वापर कशासाठी करावा लागतो किंवा करावासा वाटतो ??

माझी सर्व मनोगतींना अशी विनंती आहे की संबोधनासाठी कृपया 'जी' चा वापर करून औपचारीकपणा आणू नये. वरील कुठलेही संबोधन वापरणे जर योग्य वाटत नसेल तर केवळ नावाने संबोधावे.