पाठांतर त्याज्य समजावे का?

अजिबात नाही. कुठल्याही गोष्टी सरसकट वाईट किंवा चांगल्या नसतात. जसे पाठांतराचे फायदे आहेत तसे तोटेही. तरी पाढे, स्पेलिंग्ज ही पाठच करावी लागतात. त्यामुळे अभ्यासास वेग प्राप्त होतो.

तरी सर्वच बाबतीत 'पोपटपंची' करणे बरोबर असते असे वाटत नाही. आपण काय बोलतो आणि का बोलतो ते माहीत हवे. आपला अभ्यासक्रम जर पाठांतरावरच आधारीत असेल तर तो दोषपूर्ण आहे असे मला वाटते.

जर मुलांना एखाद्या वयांत गोष्टींचे पूर्ण आकलन होत नसेल तर त्यांना त्या गोष्टी शिकवाव्यात का असा प्रश्न ही उद्भवू शकतो. केवळ आकलन होत नाही म्हणून पाठांतर करावे हा मुद्दा मला पटला नाही.