प्रियालीताई,
कृपया प्रतिसाद देऊ नये असे जरी म्हटले आहे तरी मूळ विषयाला सुरुवात कोठून झाली आणि तो का वाढला ते सांगणे आम्हाला आवश्यक वाटते. तसेच हा वाद विनाकारण वाढतो आहे तो संपविण्यासाठी आमचा हा माफीनामा समजावा.
प्रियालीताई, आमच्या कित्येक लेखांना आम्ही आपल्याला प्रतिसाद द्या असे आवर्जून सांगतले त्यानुसार आपले मत आपण दिले. निरोपाद्वारे झालेल्या संवादातून आपण एखादी गोष्ट का अमूकच आहे हे जाणून घेण्याची वृत्ती दाखवली. शक्य होते तसे शंकानिवारण वेळेवेळी केले, काही वेळा व्यक्तीगत किंवा काही वेळा जाहीरसुद्धा.
आपल्याच नाही तर नवीन जाणून घेण्याची इच्छा ज्या सदस्यांच्या प्रतिसादातून दिसली किंवा आमचे लेखन ज्यांना आवडले त्यापैकी काहींना आम्ही वेळोवेळी त्यांचे मत विचारले आहे.
आजवर जे समजले नाही वा स्पष्ट नव्हते त्याचा खुलासा आपल्या दोघात दोन्ही बाजूंकडून करण्याचा प्रयत्न झाला. ही पार्श्वभूमी पाहता 'तत्सम' शद्बाचा उपयोग आपण जसा केला त्याचा अर्थ 'तशाप्रकारचे' असा आम्हाला जाणवला. नुसत्या तत्सम शद्बाचा अर्थ व त्या वाक्यात आलेला तत्सम शब्द याच्या आम्हाला जाणवलेल्या अर्थाने आपण रामरक्षा आणि इतर श्लोक त्याविषयी माहिती नसताना(आपल्याला शिकवले नाही असे आपण म्हणता) त्याने होणारे फायदे- नुकसान यावर मत दिले याचे नवल वाटले. जी गोष्ट माहिती नाही त्यावर काही मतप्रदर्शन करणे योग्य वाटत नाही. हा मुद्दा रामरक्षा किंवा हुतूतू वा कब्बडी असते तरी आमच्या मनात आला असता. पुरेशी कल्पना नसताना त्याचे मूल्यमापन तुम्ही करावे हे तुमच्या आमच्या आजवरच्या संवादाला सोडून आहे. आमच्या मते हे एखाद्या विषयाबद्दल आदराचे वागणे नाही.
हा विषय ज्या व्यक्तीची वागणूक माहिती आहे तिला एक प्रश्न विचारला त्यामुळे एवढा वाढेल असे वाटलेच नाही. उलट आपल्याला आमचे म्हणणे समजेल असे वाटले. इतर सदस्यांनी सुद्धा आम्हाला अमूक एक विषय माहिती नाही म्हणजे त्याची संस्काराला गरज नाही असे वाटू नये, या विचारावर इतर मते यावी याकरता चर्चेत जाहीर मत देणे जास्त योग्य वाटले; म्हणून तसे केले.
एका प्रतिसादानंतर आलेले काही सदस्यांचे प्रतिसाद आणि आमच्या प्रतिसादाला त्यानंतर आपण दिलेले उत्तर अनपेक्षित होते. एका सद्स्याच्या वागण्याचा फटका आम्हाला असेच वाटून त्यावर मत दिले नाही. आणि एका सद्स्याला धरून त्यावर टीका करण्याचा वावर आमचा नाही. एखादी शंका मनात आली तर त्याचे निराकरण प्रयत्न करून करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
राहिला प्रश्न आमच्या सुसंस्कृतपणाचा तर आमचे म्हणणे मान्य करा असा आग्रह नाही, प्रत्येक सदस्यास त्याचे विचार स्वातंत्र्य आहे. पण समज मात्र माणसानुसार वेगळी आहे. आमचे चुकले तिथे क्षमा आम्ही मागितली. शब्दाने शब्द वाढला आहे त्याबद्दल आपली आणि ज्या इतर सद्स्यांची आमचे चूक आहे अशी धारणा झाली आहे त्यांची बिनशर्त क्षमा मागत आहे. वादासाठी वाद घालायचा नाही.त्याला अंत नाही.
इतर कोणत्याही सदस्याने जाहीर वा व्यक्तिगतरित्या आमच्या तत्सम शद्बाच्या वाक्यातील अर्थाचे स्पष्ट व खुलास्याने समर्थन केले नाही , त्यामुळे आम्ही आत्मपरीक्षण करतो आहोत, आपले जाहीर वागणे वेगळे ठरले आहे तरी कालांतराने आपले आमच्या विषयीचे मत बदलले तर आपणही आत्मपरीक्षण कराल असा विश्वास आपले निरोपातील संवाद पहाता वाटतो. आपले जाहीर वागणे वेगळे ठरले आहे