जिथे जिथे सूत्र आणि/किंवा नियम आहेत अशा काही मूलभूत गोष्टी पाठ असाव्यात असे वाटते. जसे की पाढे, वृत्तछंदांची सूत्रे, संस्कृतातील सुभाषिते-शब्द-क्रियापदांची रुपे, ट्रिगनॉमेट्रीचे(मराठी?) मूलभूत नियम, भौतिकशास्त्राचे मूलभूत नियम, (आमच्याकडून पिरिऑडिक टेबल (मराठी- मूलद्रव्य सारणी?) मधली पहिली ३६ मूलद्रव्ये पाठ करून घेतली होती.) .इ.इ.

पण प्रश्नोत्तरे, ससंदर्भ स्पष्टीकरणे, घटना-घटक संबंध, इ.इ. अभ्यासाच्या जोरावर लिहिता यायला हवे असे वाटते. यांचा सराव करण्यात काहीच हरकत नाही, पण पोपटपंची नको असे वाटते.

यातली काही पाठांतरे आपण का करतो आहोत असे मला तेंव्हा वाटायचे. पण आता कामाच्या ठिकाणी सूत्रे, नियम इ.इ. अतिशय प्रभावीपणे उपयोगी पडतात असे वाटते.

"जी गोष्ट लिहून ठेवता येते ती लक्षात ठेवू नये" असे आईन्स्टाईन म्हणाला होता असे म्हणतात. अहो, पण सगळेच आईन्स्टाईन नसतात, त्याचे काय?