यशस्वी उद्योजक वगरे मंडली ही केवळ प्रामाणिकपणा, सचोटी, कष्ट निष्ठा आणि प्रॉडक्ट्ची क्वालिटी, कस्टमर रिलेशन ह्या गोष्टींवर यशस्वी झालेली असतात!! त्यांना नशीब, वडलांची संपत्ती, मंत्रीलोकांशी संबंध, आयत निर्यातीवर बंधाने, परवाने, मोनोपॉली असे काही लागत नाही. त्यामुळे ती इतरांना कष्टाचे महत्त्व सांगत रहातत. खरे तरे हे इतके यशस्वी उद्योजक असताना भोवतीच्या लाखभर जनतेचे कष्ट कमी व्हायला हवेत, नाहीतर त्यांच्या उत्पादनाचा आणि कारखान्यांचा सामान्य माणसांना काय फायदा? पण ते नाही. परवा पुण्यातले एक यशस्वी उद्योगसम्राट दिल्ल्लीला गेले ते तर म्हणाले पुढे आणखी वीस वर्षे कष्ट करवे लागणार!